मुंबई :मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील (Malegaon Blast Case) 29 साक्षीदार आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात फितूर (Malegaon blast case witnesses Fitur) म्हणून घोषित केले आहेत. या प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित (Accused Prasad Purohit) आणि आरोपी सुधाकर चतुर्वेदी (Accused Sudhakar Chaturvedi) यांच्या संबंधित साक्षीदार क्रमांक 282 फितूर म्हणून न्यायालयाने घोषित केला आहे. आता या प्रकरणात 105 साक्षीदारांची जबाब अद्याप नोंदणी बाकी आहे.
एनआयए कोर्टामध्ये साक्षदारांची जबाब नोंदणी -मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आरोपी प्रसाद पुरोहित आणि आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांच्या संदर्भातील विशेष एनआयए कोर्टामध्ये साक्षदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता. एटीएसने या संबंधित साक्षीदाराचा जबाब नोंदवला होता. साक्षीदाराने कुठल्याही प्रकारचा जबाब मी दिलेला नाही. तसेच स्वाक्षरी देखील केलेली नाही. तसेच आरोपींना ओळखण्यापासून देखील नकार दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात 29 साक्षीदार फितूर म्हणून घोषित केला आहे.
असा झाला हिंदू दहशतवाद शब्दाचा जन्म -देशात हिंदू दहशतवाद जन्माला आणणारा शब्द मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पासून अस्तित्वात आला होता. आतापर्यंत 28 जणांनी या खटल्यात साक्ष बदलली आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी सध्या एनआयएच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या सुनावणीतही एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने साक्ष बदलली होती.
काय आहे प्रकरण ?
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.