मुंबई- येथील वांद्रे, अंधेरी आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील गोदामातून काळ्याबाजारासाठी साठवून ठेवलेले 15 कोटी रुपयांचे 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये 3 लाख 50 हजार एन 95 मास्क चा समावेश होता. मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्र. 9 ने ही कारवाई केली आहे.
मुंबई : काळ्या बाजारासाठी साठवून ठेवलेले 15 कोटींचे मास्क जप्त, चौघांना अटक - कोरोना
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. पण, काहीजण याचा काळाबाजर करत आहेत. मुंबई पोलिसांनी वांद्रे परिसरातून 15 कोटींचे 25 लाख मास्क जप्त केले आहे.
प्रातिनिधीक छायाचित्र
गृहमंत्री अनिल देशमुख या मास्कची पाहणी केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून दोघे पळून गेले आहेत. या मास्कची साठवणून काळ्याबाजारासाठी केली गेली होती.
हेही वाचा -कोरोनाच्या भीतीने वाढताहेय दडपणाचे रुग्ण, 'अशी' घ्या काळजी
Last Updated : Mar 24, 2020, 2:08 PM IST