मुंबई :आरोपी तरुण डेटिंग अॅचच्या माध्यमातून अज्ञात महिला आणि तरुणींना संपर्क नंबर काढायचा. यानंतर त्यांना अश्लील मेसेज आणि व्हॉट्सअॅप कॉल करायचा. एका 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 454 (डी), 509, 506 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल केला. पॉस्को कायद्याचे कलम १२ अनुसार त्याला अटक करण्यात आली आहे.
गर्लफ्रेंड मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न फसला :विशेष म्हणजे, विद्यार्थ्याच्या आईच्या तक्रारीनंतर डीसीपी अजय कुमार बन्सल (झोन 12) यांच्या मार्गदर्शनाखाली मालाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे, पीएसआय धीरज वायकोस यांनी तत्काळ मोबाईल नंबर आणि लोकेशन तपासण्यास सुरुवात केली. तपासात ही बाब समोर आली की, आरोपी मालाड पूर्व येथील पुष्पा पार्कचा रहिवासी आहे. चौकशीदरम्यान आरोपी हर्ष गिंद्रा याने पोलिसांना सांगितले की, इतर मुलांच्या गर्लफ्रेंड आहेत. त्याला कोणीही पसंत करत नाही आणि त्याला गर्लफ्रेंड हवी होती. त्यामुळेच तो असे करत होता.