मुंबई- कांद्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. कांद्याला डॅालरपेक्षा जास्त भाव आला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कांद्यावर केंद्रीत झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील डोंगरी परिसरात चक्क कांद्याची विक्री करणारी 2 दुकान फोडण्यात आली आहेत. या दुकानातून 21 हजार 160 रूपयांचा कांदा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबईत चक्क कांद्याची चोरी.. दोन दुकाने फोडून 21 हजारांचा कांदा लांबवला
अकबर अब्बास शेख यांचे डोंगरी मार्केट येथे कांदे-बटाटे विकण्याचा अधिकृत गाळा आहे. या गळ्यात ठेवलेल्या 22 कांद्याच्या गोण्यांपैकी 2 कांद्याच्या गोण्या चोरीला गेल्या.
हेही वाचा-भाजपकडून सर्वाधिक अन्याय गोपीनाथ मुंडेंवर; पक्षातील ओबीसी गट घेणार नवीन निर्णय
ही घटना 5 डिसेंबर ते 6 डिसेंबरच्या रात्री घडली होती. यातील तक्रारदार अकबर अब्बास शेख यांचे डोंगरी मार्केट येथे कांदा बटाटा विकण्याचा अधिकृत गाळा आहे. या गळ्यात ठेवलेल्या 22 कांद्याच्या गोणीपैकी 2 कांद्याच्या गोण्या या चोरीला गेल्या होत्या. असाच काहीसा प्रकार इरफान शेख यांच्याही दुकानात घडला आहे. त्यांच्या दुकानातूनही 56 किलो कांद्याची 1 गोणी चोरीला गेली आहे. या प्रकरणात प्रतिकिलो 120 रुपये या हिशोबाने 21 हजार 160 रुपये किमतीचा कांदा चोरीला गेला आहे. साबिर मोहम्मद शफी शेख (वय 33), मोहमद इमरान अब्दुल लतीफ शेख (वय 30) असे आरोपीचे नावे आहेत. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात कलम 379 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.