महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आज अधिवेशनाची सुरूवात होणार आहे...योग्य वेळी योग्य निर्णय सांगायचे असतात, शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य...सेना-भाजपचे सरकार म्हणजे आंधळा चौकीदार असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे...जळगावमध्ये एकतर्फी प्रेमातून कनिष्ठ लिपिक महिलेवर प्राध्यापकाचा प्राणघातक चाकू हल्ला...सुझान खानचा हृतिकला खंबिर पाठिंबा असून त्यासंदर्भात पोस्टदेखील शेअर केली आहे...

बातमी, सर्वात आधी ...

By

Published : Jun 20, 2019, 9:01 AM IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने गुरूवारी होणार अधिवेशनाची सुरूवात

नवी दिल्ली - सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या कामाकजाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण होईल. नवीन सरकारच्या पहिल्या संसदीय अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर -

योग्य वेळी योग्य निर्णय सांगायचे असतात, शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

मुंबई - शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंचे प्रेम घेण्यासाठी आलो असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच शिवसैनिकांची उर्जा घेण्यासाठी आलो आहे. आमचे सगळे ठरले असून, योग्य वेळी योग्य निर्णय सांगू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. वाचा सविस्तर -

सेना-भाजपचे सरकार म्हणजे आंधळा चौकीदार; धनंजय मुंडेंची टीका

मुंबई - राज्यपालांचे अभिभाषण पाहून राज्यात 'ऑल इज वेल' वाटेल परंतु राज्यात काहीच ऑल इज वेल नाही, तर नथिंग इज वेल आहे. राज्यातील सेना-भाजपचे सरकार म्हणजे आंधळा चौकीदार असल्याची जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानपरिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांनी सरकारच्या विविध योजनांची व त्या ज्यापद्धतीने राबवल्या जात आहेत त्याची चिरफाड केली. वाचा सविस्तर -

एकतर्फी प्रेमातून कनिष्ठ लिपिक महिलेवर प्राध्यापकाचा प्राणघातक चाकू हल्ला

जळगाव - जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील नाडगाव-कोल्हाडी रस्त्यावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका प्राध्यापकाने कनिष्ठ लिपिक महिला कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. वाचा सविस्तर -

सुझान खानचा हृतिकला खंबिर पाठिंबा, शेअर केली 'ही' पोस्ट

मुंबई - बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि त्याची बहिण सुनैना रोशन यांच्यातील नात्यात दुरावा तयार झाला असल्याची बातमी अलिकडेच समोर आली आहे. कंगना रनौतची बहीण रंगोली चंडैल हिने सुनैनासंबधी काही ट्विट केल्याने अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. तिच्या संबंधी येत असलेल्या बातम्या रोशन परिवारासाठी चिंतेची बाब ठरत आहे. मात्र, या कठिण परिस्थितीत हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान ही रोशन कुटुंबीयांच्या खंबिरपणे पाठिशी उभी राहिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने हृतिकची पाठराखण केली आहे. वाचा सविस्तर -

बातमी, सर्वात आधी ...

ABOUT THE AUTHOR

...view details