महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे, 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - 20 chartered officers transfers in Maharatsra

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. सध्या एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक पदावर कार्यरत असणाऱ्या मुंढेंची आता नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

20 chartered officers transfers
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

By

Published : Jan 21, 2020, 8:42 PM IST

Updated : Jan 21, 2020, 11:15 PM IST

मुंबई - राज्य सरकारकडून 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर, पुणे आणि इतर काही ठिकाणच्या महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंढे यांच्यासह एकूण वीस सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली पुणे महानगरपालिकेत करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बदली साखर आयुक्तपदी करण्यात आली आहे. संपदा मेहता यांची बदली विक्रीकर सह आयुक्त पदावर केली आहे. तर अश्विनी भिडे यांची मेट्रोच्या संचालकपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो 3 च्या व्यवस्थापकीय संचालकपदि रणजितसिंग देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंढे यांची महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागांमध्ये बदली झाली असून, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्यावरुन त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. नाशिक, नवी मुंबई महापालिकेत सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्याविरोधात एकत्र आल्याचे याआधी दिसले आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे, ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच राजकारण्यांना जरी ते नकोसे वाटत असले तरी, सर्वसामान्यांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत. काही ठिकाणी तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे.

Last Updated : Jan 21, 2020, 11:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details