महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेट केबल वायरचे काम करताना शॉर्टसर्किट, दोन युवक जखमी - short circuit

नेट केबल वायर दुरुस्तीचे काम करते वेळी टाटा पावर तारेचा संपर्क आल्याने शार्टसर्कीट होऊन २ युवक जखमी झाले आहेत. ही घटना विक्रोळीतल्या टागोरनगर विभागातील अशोक नगर झोपडपट्टीत घडली.

शॉकसर्किट होऊन २ युवक जखमी

By

Published : Jul 4, 2019, 10:33 AM IST

मुंबई - नेट केबल वायर दुरुस्तीचे काम करते वेळी टाटा पावर तारेचा संपर्क आल्याने शार्टसर्कीट होऊन २ युवक जखमी झाले. ही घटना विक्रोळीतल्या टागोरनगर विभागातील अशोकनगर झोपडपट्टीत घडली. अनिल चौरसिया (वय, 22) व अब्दुल खान (वय, 16) अशी जखमींची नावे आहेत.

नेट केबल वायरचे काम करताना शॉकसर्किट होऊन २ युवक जखमी
विक्रोळी टागोरनगर ग्रुप नंबर ३ येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत प्रेम मोटर्सवरील छतावर रात्रीच्या ८ वाजताच्या सुमारास २ युवक नेट केबलचे काम करत होते. हे काम करत असताना नेट केबल व टाटा पावरची तार संपर्कात आल्यामुळे शॉर्टसर्किट झाल्यामुळे स्फोट झाला. यामध्ये अनिल चौरसिया आणि अब्दुल खान जखमी झाले. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही 3 ते 4 टक्के भाजले असून, त्यांची स्थिती ठीक असल्याचे सायन रुग्णालयाचे डॉक्टर सुरेश (सीएमओ) यांनी दिली. शहरात मोठया प्रमाणात केबल चालक वायर टाकून रहिवाशांना धोका निर्माण करतात, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे राहिवासी बोलत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details