मुंबई - मरीन ड्राईव्ह समुद्रकिनारी एका मुलाचा तर जुहू चौपाटीवर एका माणसाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारिन ड्राईव्ह येथे भैरव रमेश बारिया या ११ वर्षीय मुलाचा तर महेश मारुती शिंदे या ४० वर्षीय माणसाचा जुहू येथे बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास जुहू समुद्रकिनारी एक व्यक्ती बुडाल्याची माहिती महापालिका नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यांनतर थोड्याच वेळात मरीन ड्राईव्हवर एक मुलगा बुडल्याची माहिती पालिकेला मिळाली. पोलीस व अग्निशमन दलांनी या दोघांनाही बाहेर काढले.
मुंबईच्या अरबी समुद्रात बुडून २ जणांचा मृत्यू - Death
मरीन ड्राईव्ह येथे बुडलेल्या मुलास अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून त्या कूपर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दुसरा जुहू येथील व्यक्ती दुपारी बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही अग्निशमन अधिकाऱ्यांनी शोधून बाहेर काढून रुग्णाल्यात नेले. मात्र त्याला ही डॉक्टरने मृत घोषित केले आहे.

पाऊस आता काही दिवसांवर आहे, तर भरती ओहोटीची काळजी घेण्याची गरज होती. समुद्र किनारी पोलीस तैनात करण्यात येतात ते यावेळेस कुठे होते आणि हे दोघे समुद्रात इतके आत गेले, याकडे समुद्र किनाऱ्यालगतच्या पोलिसांनी लक्ष का दिले नाही? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.