महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या सीएसएमटीवरून २ महिन्यांच्या मुलाचे अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद - मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून २ महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. मुलाची आई झोपल्याचा फायदा उचलत एका अनोळखी महिलेने या मुलाला घेऊन पळ काढला आहे.

मुंबईच्या सीएसएमटीवरून २ महिन्यांच्या मुलाचे अपहरण

By

Published : Apr 3, 2019, 8:35 PM IST

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून २ महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. मुलाची आई झोपल्याचा फायदा उचलत एका अनोळखी महिलेने या मुलाला घेऊन पळ काढला आहे. मुलाला घेऊन पळ काढतानाची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गंगा सुरेश, असे या आरोपी महिलेचे नाव असल्याचे तपासात समोर आले असून बाळाला घेऊन ती मुलुंडला उतरल्याचेही समजते.

बाळाला घेऊन आरोपी महिलेने ७:२० ची आसनगाव ट्रेन पकडली. त्यानंतर ती मुलुंड परिसरात उतरून पुर्वेकडे जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. गंगा सुरेश, अशी या महिलेची ओळख आत्तापर्यंत समोर आली आहे. विशेष म्हणजे बाळाची आई सुनिता सौड यांची या महिलेशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. तेव्हापासून आरोपी महिला सुनितासोबत राहत होती. त्यामुळे ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांना आहे.

मुंबईच्या सीएसएमटीवरून २ महिन्यांच्या मुलाचे अपहरण

याप्रकरणी पोलिसांनी गंगा नावाच्या महिलेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या जीआरपी, जीआरपीच एसटीएफ आणि स्थानिक पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details