महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात सर्वाधिक 'फाशी'च्या शिक्षा माफ - प्रणव मुखर्जी

सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर, राष्ट्रपती यांच्याकडे याबाबत दया याचिका दाखल करण्यात येते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त दया याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील

By

Published : May 26, 2019, 12:49 PM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर, राष्ट्रपती यांच्याकडे याबाबत दया याचिका दाखल करण्यात येते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त दया याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. याची नोंद माहिती अधिकारातून मिळाली आहे. मागील 38 वर्षांमध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात सर्वाधिक म्हणजे एकूण 19 आरोपींना फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले आहे.

या विषयी माहिती देताना आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात एकूण 22 याचिका आल्या होत्या, त्यात त्यांनी 22 याचिकेवर सुनावणी करत 19 दया याचिकांवर फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. त्यात 3 दया याचिका रद्द करण्यात आल्या. आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी ही माहिती केंद्रीय गृह मंत्रालय येथे माहिती अधिकारातून मिळवली आहे. 1981 पासून आतापर्यंत राष्ट्रपतींनी किती दया याचिकांवर सुनावणी गेली. तसेच माफी दिली याबद्दलची माहिती, त्यांना न्यायिक विभाग सचिव डॅनियल रिझल्ट यांनी माहिती अधिकारातून दिली.

इतर माजी राष्ट्रपतींनी दया याचिकेवर केलेली सुनावणी -
प्रणव मुखर्जी यांनी 35 दया याचिकांवर सुनावणी केली होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आपल्या कार्यकाळात 2012 ते 2017 पर्यंत 35 दया याचिका यांच्यावर सुनावणी केली. त्यांनी 35 याचिकामध्ये 4 दया याचिकांवर फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले होते. एपीजे अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती यांनी आपल्या कार्यकाळात फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले होते. तसेच माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंगजी यांनी त्यांना आलेल्या 19 मधून फक्त 3 फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले होते.


माजी राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांनी 39 याचिकांची सुनावणीत 6 फाशीच्या शिक्षेचे पासून जन्मठेपेत रूपांतर केले. 33 जणांची त्यांनी याचिका फेटाळली होती. तसेच माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनीदेखील फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. परंतु ते काही कमी प्रमाणात होते.

या आरोपींची दया याचिका फेटाळली -
माजी राष्ट्रपती के. नारायण यांच्या कार्यकाळात दरम्यान 1997 ते 2002 पर्यंत एकदा याचिका आली होती. त्यांनी ती रद्द केलेली आहे. 1993 मध्ये मुंबई झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आरोपी याकूब मेमन यांनी दोन वेळा दया याचिका सादर केली होती. मात्र, त्यावेळेस असलेले राष्ट्रपती के नारायण यांनी ती फेटाळली, अशी माहिती देखील या माहिती अधिकारात मिळाली. तसेच आरोपी 2006 साली अफजल गुरू या संसदेवर हल्ला केलेल्या आरोपीने देखील दया याचिकेसाठी अर्ज केला होता. त्यांची देखील याचिका फेटाळली गेली होती.

इतर सर्व राष्ट्रपतींच्या कार्यकाळात दया याचिकेवर सुनावणी झाल्या. मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दया याचिका यांच्यावर 19 फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details