महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता....मंगळवार दुपारी 2 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर

महाराष्ट्रात जातीयवादाचे बीज कोण पेरतो याची चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली....राधाकृष्ण विखेंचे मंत्रीपद धोक्यात यण्याचाची शक्यता आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली...येत्या शुक्रवारपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे...'भाजप खासदार ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार'...लग्नाअगोदर गर्भवती असल्याचे कळताच नवऱ्याने दिला घटस्फोट, प्रेयसीने लग्नाचा तगादा लावताच प्रियकराने पाजले विष

By

Published : Jun 18, 2019, 2:04 PM IST

बातमी, सर्वांच्या आधी..

Live; विधिमंडळ अधिवेशन; महाराष्ट्रात जातीयवादाचे बीज कोण पेरतो याची चौकशी करावी - अजित पवार

मुंबई - आर्वी येथे दलित बालकावर अत्याचार झाला. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी. महाराष्ट्रात असे जातीयवादाचे बीज कोण पेरतो, याची सरकारने चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. वाचा सविस्तर -

राधाकृष्ण विखेंचे मंत्रीपद धोक्यात, उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई - काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात मंत्री मंडळ विस्तारात गृहनिर्माण मंत्रिपदाची माळ पडली. मात्र, त्यांच्या मंत्रीपदाच्या विरोधात ज्येष्ठ वकील अॅड. सतीश तळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाचा सविस्तर -

येत्या शुक्रवारपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येईल; हवामान खात्याचा अंदाज

पुणे - बळीराजासह सर्व महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असलेल्या पावसाची अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 19 तारखेला मुंबईत चांगला पाऊस होईल आणि 21 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याप्रमाणे अंदाज घेऊनच शेतकऱयांनी काळजीपुर्वक पेरणी करावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. वाचा सविस्तर -

'भाजप खासदार ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार'

नवी दिल्ली - लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत होणाऱ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राजस्थानमधील कोटा येथून खासदार झालेले ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार आहेत. सर्वांच्या सहमतीनुसार ओम बिर्ला आज अर्ज दाखल करणार आहेत. वाचा सविस्तर -

लग्नाअगोदर गर्भवती असल्याचे कळताच नवऱ्याने दिला घटस्फोट, प्रेयसीने लग्नाचा तगादा लावताच प्रियकराने पाजले विष

अमरावती - प्रियकराकडे लग्नाची मागणी करणाऱ्या गर्भवती प्रेयसीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत् न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर -

बातमी, सर्वांच्या आधी..

ABOUT THE AUTHOR

...view details