मुंबई- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांच्यासह महापालिकेच्या १७८७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७० जणांचा मृत्यू झाला असून १०५० कामगारांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७३७ कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर काही क्वारंटाईन असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई महापालिकेचे १७८७ कर्मचारी कोरोनाबाधित... ७० जणांचा मृत्यू
मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी कोरोना संकटात त्यांच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या १७८७ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील १०५० कर्मचारी बरे होऊन घरी गेले आहेत. पालिकेच्या ७३७ कर्मचार्यांवर अद्यापही विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी कोरोना संकटात त्यांच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या १७८७ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील १०५० कर्मचारी बरे होऊन घरी गेले आहेत. पालिकेच्या ७३७ कर्मचार्यांवर अद्यापही विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेच्या प्रत्येक विभागातील कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यात स्वच्छता विभाग, सुरक्षा, अग्निशमन दल, पाणीपुरवठा, कचरा विभाग यासह इतर विभागांचे कर्मचारी आहेत. आपत्ती नियंत्रण कक्षातील एक डझन कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे.
गेल्या ७ दिवसांत कोरोनामुळे पालिकेच्या १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात उपायुक्त शिरीष दीक्षित यांचाही समावेश आहे. उपायुक्त पदावरील अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पालिकेने चांगला अधिकारी आणि अभियंता गमावला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, ९ जूनपर्यंत पालिकेच्या १७१२ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यादरम्यान ५५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेचे १०४२ कर्मचारी कोरोनामधून बरे झाले असून ६७० जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या ८ तसेच सुरक्षा रक्षकांच्या ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पालिकेचे ३६ सुरक्षा रक्षक रुग्णालयात दाखल आहेत.