महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर - NAGPUR

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुन्हा डॉक्टरांचा देशव्यापी संप आहे...शिमगा सरला तरी कवित्व कायम अशी बंगालची स्थिती असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले मत...ताजमहाल पहायला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला अपघात झाला असून यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे...एकनाथ खडसे महाराष्ट्राचे 'अडवाणी'? पुनर्वसनाची उरलीसुरली आशाही मावळली...क्रिकेटप्रेमींकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ट्विटरवर 'ट्रोल फिरकी'...

आज.. आत्ता...

By

Published : Jun 17, 2019, 9:03 AM IST

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध; आज पुन्हा डॉक्टरांचा देशव्यापी संप

मुंबई - कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी 14 जूनला संप पुकारला होता. मात्र, सरकारने या संपाला दाद दिली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. आज सकाळी 10 वाजतापासून आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याची माहिती आयएमए आणि डीएमए या डॉक्टरांच्या संघटनेने दिली आहे. वाचा सविस्तर -

शिमगा सरला तरी कवित्व कायम अशी बंगालची स्थिती - मोहन भागवत

नागपूर - शिमगा सरला तरी कवित्व जात नाही, अशी परस्थिती सध्या बंगालची आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात असतात, मात्र निवडणुकीनंतर देखील देशात अराजकता पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत. हे मानवतावादाविरोधात असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. वाचा सविस्तर -

उत्तरप्रदेश : ताजमहाल पहायला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला अपघात, ८ जण ठार

लखनौ - उत्तर प्रदेशमधील मथुरा शहरापासून ३० किमी अंतरावर यमुना महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. कारची ट्रकला जोरदार धडक बसल्याने रविवारी रात्री साडेआठ वाजता हा अपघात घडला. या अपघातात कुटुंबातील ८ जण ठार झाले आहेत. वाचा सविस्तर -

एकनाथ खडसे महाराष्ट्राचे 'अडवाणी'? पुनर्वसनाची उरलीसुरली आशाही मावळली

जळगाव - आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अवघ्या ३ महिन्यांसाठी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. भाजपच्या सापत्न वागणुकीमुळे एकनाथ खडसे यांच्या पुनर्वसनाची उरलीसुरली आशाही मावळली असून ते महाराष्ट्राचे 'अडवाणी' ठरल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर -

क्रिकेटप्रेमींकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ट्विटरवर 'ट्रोल फिरकी'

नवी दिल्ली - पाकिस्तानचा सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला क्रिकेटप्रेमींनी ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी गमतीशीर ट्विटर करत पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची फिरकी घेतली आहे. वाचा सविस्तर -

बातमी, सर्वांच्या आधी..

ABOUT THE AUTHOR

...view details