मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. या परिस्थितीचा काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर या गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे. तसेच हे गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर टिक टॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात सायबर सेल पोलिसांकडून 161 गुन्हे दाखल - cyber cell लाैे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. या परिस्थितीचा काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर सेल या गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत 161 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बीड 22, कोल्हापूर 13 , पुणे ग्रामीण 12 , मुंबई 11 , जळगाव 10 , जालना 9 , नाशिक ग्रामीण 8 , सातारा 7 , नांदेड 6 नागपूर शहर 5 , नाशिक शहर 5, परभणी 5 , ठाणे शहर 5 , बुलढाणा 4 , गोंदिया 3 , भंडारा 3 , अमरावती 3 , लातूर 3 , नंदुरबार 2 , नवी मुंबई 2 , उस्मानाबाद 2 , हिंगोली 1 असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सायबरनुसार धार्मिक तेढ निर्माण करणारे आपत्तीजनक व्हाट्सअप मेसेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी 89 गुन्हे दाखल झाले आहेत . तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी 41 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिक टॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून , ट्विटरद्वारे आपत्तीजनक केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी 23 गुन्हे आतापर्यंत दाखल करण्यात आले असून यामध्ये 36 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.