महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाभा रुग्णालयातील 15 कर्मचाऱ्यांना केले क्वारेन्टाईन - कोरोना रुग्ण

भाभा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने मुख्य वैद्यकीय अधिकऱ्यांची भेट घेत सर्वांना क्वारेन्टाईन करण्याची मागणी केली.

Bhabha Hospital
भाभा रुग्णालय

By

Published : Apr 8, 2020, 1:43 PM IST

मुंबई - कोरोनाबांधित रुग्णांची संख्या मुंबईमध्ये झपाट्याने वाढताना दिसत आहे. वांद्रे येथील भाभा रुग्णालयात आज (बुधवार) सकाळी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना क्वारेन्टाईन करण्याची मागणी केली. त्यामुळे त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या 15 कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेऊन त्यांना क्वारेन्टाईन करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

भाभा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने मुख्य वैद्यकीय अधिकऱ्यांची भेट घेत सर्वांना क्वारेन्टाईन करण्याची मागणी केली.

कर्मचाऱ्यांनी क्वारेन्टाईन करण्याची मागणी लावून धरली. सर्व कर्मचाऱ्यांना क्वारेन्टाईन करण्याऐवजी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन त्यांना क्वारेन्टाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रुग्णालयातील 15 कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन त्यांना रुग्णालयातच क्वारेन्टाईन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details