मुंबई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 25 मे रोजी दुपारी 12 वाजता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची धकधक वाढली आहे. इयत्ता दहावीचा निकालही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुपारी लागणार निकाल - बारावीच्या परीक्षेचा निकाल 25 मे रोजी लागणार आहे. हा निकाल दुपारी 2 वाजेच्या दरम्यान संकतस्थळावर विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांची धकधक वाढली आहे. तसेच पालकांनाही विद्यार्थ्यांच्या निकालाचे टेन्शन आले असणार हे नक्की.
येथे पाहता येणार निकाल : बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होते. या परीक्षांचा निकाल मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत दोन वेबसाईट mahresult.nic.in, www.mahahhscboard.in वर पाहता येणार आहे. विद्यार्थी वेबसाइटसह आपल्या मोबाईलवरही एसएमएसद्वारे पाहू शकतील. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील 10 हजार 388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून साधरण 14 लाख 57 हजारह 293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर दहावीसाठी 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.