मुंबई- मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व थंड व्हावा, यासाठी येत्या वर्षभरात १२ एसी लोकल मध्य व पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामध्ये मध्यसाठी ६ आणि पश्चिम रेल्वेसाठी ६ अशा १२ लोकल दाखल होणार आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी दिली.
मुंबईत वर्षभरात धावणार डझनभर एसी लोकल, महिलांच्या सुरक्षेसाठी असणार 'ही' खास व्यवस्था - 12 एसी
मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व थंड व्हावा, यासाठी येत्या वर्षभरात १२ एसी लोकल मध्य व पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
जून २०१९ पासून दर महिन्याला १ एसी लोकल मुंबईत दाखल होईल. यातील ३ एसी लोकल या मेधा बनावटीच्या तर ५ एसी लोकल भेल बनावटीच्या असतील. या एसी लोकल विरारच्या पुढे डहाणूपर्यंत चालविण्यात येतील, असे अग्रवाल यांनी सांगितले.
रेल्वेत महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने १३३ एमयू रॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर आतापर्यंत १८ महिलांच्या डब्यात टॉक बॅक प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच लवकरच सर्व डब्यात टॉक बॅक प्रणाली बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पार पडेल, असे अग्रवाल यांनी सांगितले.