मुंबई - मुंबईत आज (सोमवारी) कोरोनाचे नवे 970 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 17 हजार 421 वर पोहोचला आहे. आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 6 हजार 490 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 790 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 90 हजार 089 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 20 हजार 546 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 76 टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 78 दिवसांवर पोहोचला आहे.
दिलासादायक! मुंबईत नव्या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक - मुंबई कोरोना अपडेट
मुंबईत आज (सोमवारी) कोरोनाचे नवे 970 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 17 हजार 421 वर पोहोचला आहे. आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 6 हजार 490 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 790 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने मुंबईत आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 23 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 29 पुरुष तर 17 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1 हजार 790 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 90 हजार 089 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 17 हजार 421 रुग्ण असून, 90 हजार 089 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 6 हजार 490 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 20 हजार 546 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 78 दिवस तर सरासरी दर 0.89 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 618 चाळी आणि झोपडपट्टी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 470 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 5 लाख 51 हजार 994 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.