महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर

राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Nov 8, 2020, 9:09 PM IST

मुंबई -राज्यात आज (रविवारी) ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ८२३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा -दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दिवाळीनंतर पुढील १५ दिवस महत्वाचे असल्याने, जम्बो कोव्हीड सेंटर देखभाल व दुरूस्ती करून सज्ज ठेवावेत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

रुग्ण संख्या कमी होत असल्याने नागरिक मास्क वापरतांना दिसत नाहीत. मात्र हे चुकीचे आहे, कोरोनाच संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे जे मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. मास्क घालण्याबाबत जनतेत जनजागृती करावी. त्याचप्रमाणे भविष्यात जम्बो कोरोना सेंटरची गरज भासू शकते, या पार्श्वभूमीवर सर्व सेंटर तयार ठेवावेत. राज्यात पुरेसा औषधसाठा आहे की नाही याचा आढावा घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details