महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"लातूरमध्ये फक्त मुख्यालयातच होणार कामगार दिन साजरा"

वाढत्या कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. कामगार दिनी सर्व शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक झाले आहे.

g shrikant
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

By

Published : Apr 30, 2020, 9:33 PM IST

लातूर - लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालत करत, येत्या शुक्रवारी (1 मे) होणाऱ्या कामगार दिनानिमीत्त लातूरमध्ये फक्त जिल्हा मुख्यालयातच छोटेखानी कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.

वाढत्या कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. कामगार दिनी सर्व शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याच उपस्थितीमध्ये ध्वजारोहण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे.

शिवाय नागरिकांनी हा कामगार दिन घरीच साजरा करण्याचे अवाहनही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. जिल्ह्यात ७ कोरोनाग्रस्त असून, हे सर्व उदगीर शहरातच आहे. याठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परजिल्ह्यातील नागरिकांना किंवा लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी, कामगार यांना आपल्या मूळ गावी परतायचे असेल तर त्यासाठी एक नियमावली आहे. ती पूर्ण केल्याशिवाय त्यांना जिल्हा सोडता येणार नसल्याचेही जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितले आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अपमध्ये संबंधित नागरिकांनी माहिती भरून त्यांची आरोग्य तपासणी करूनच परवानगीने त्यांना जाता येणार असल्याचे सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details