महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरात महिलांचा एल्गार : अवैध दारूविक्री कायमची बंद करा, अन्यथा.. - बोरसुरी

निलंगा तालुक्यातील बोरसुरी गावात महिलांनी अवैध दारू अड्डे उध्वस्त केले. महिलांनी केलेल्या एल्गारामध्ये अवैध ताडी, दारूविक्री करणाऱ्या अड्ड्य़ांची तोडफोड करण्यात आली.

Women in borsuri protests against illegal liqure shops at latur
लातूरमधील बोरसुरी येथे महिलांनी अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या दुकानांची तोडफोड केली

By

Published : Dec 27, 2019, 3:17 PM IST

लातूर -निलंगा तालुक्यातील बोरसुरी गावात महिलांनी अवैध रित्या दारू विक्री करणारे अड्डे उध्वस्त केले. यावेळी महिलांनी ताडी-दारू विक्री करणाऱ्या अड्ड्य़ांवर हल्ला करत, त्यांची तोडफोड केली, तसेच काही पोलीस व्हॅनच्या काचाही फोडल्या आहेत. प्रशासनाने सध्या बोरसुरी गावातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.

लातूरमधील बोरसुरी येथे महिलांनी अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या दुकानांची तोडफोड केली

हेही वाचा... चंद्रपुरातील आदिवासी माना जमातीचा नागदिवाळी उत्सव, 'असा' करतात साजरा

निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथे अवैध दारूविक्रीला विरोध करत महिलांनी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर हल्ला केला. यावेळी गावातील दारू विक्रीच्या अड्यांवर जाऊन तोडफोड करण्यात आली. महिलांनी हा हल्ला करताना दारू विक्री करणाऱ्या लोकांची बाजू घेणाऱ्या पोलीसांच्या गाडीच्या देखील काचा फोडल्या. तसेच पोलिसांवरही दगडफेक केली गेली.

हेही वाचा... तामिळनाडूमध्ये भाजप कार्यकर्त्याने बांधले पंतप्रधान मोदींचे मंदिर, दररोज करतो पूजा

बोरसुरी गावातील महिलांसह तरूणांनी देखील यावेळी सहभाग घेतला होता. गावातील एकूण चार दारू अड्ड्यांवर हल्ले करत, दारूच्या बाटल्या आणि दारूसाठा रस्त्यावर फेकून दिला. काही गावकऱयांनी अवैध दारूविक्री करणाऱ्या लोकांना चोपही दिला आहे. सध्या बोरसुरी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.

हेही वाचा... माळेगाव यात्रेत आजही भरतो गाढवांचा 'कॅशलेस' बाजार

ABOUT THE AUTHOR

...view details