लातूर - निलंगा तालुक्यातील चिंचोली सयाखान येथे अवैधरित्या दारुविक्री केली जात आहे. त्यामुळे या गावातील महिलांनी दारूबंदीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
लातूरमध्ये दारुबंदीसाठी महिलांचे ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन
निलंगा तालुक्यातील चिंचोली सयाखान येथे अवैधरित्या दारुविक्री केली जात असल्यामुळे गावातील महिलांनी दारुबंदीसाठी ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन केले.
ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या महिला
चिंचोली सयाखान गावात अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर येत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरीही याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये ठाण मांडले आणि दारू विक्री बंद करावी, अशी मागणी केली.
गावातील महिलांनी तंटामुक्त समितीला याबाबत निवेदन दिले. तसेच तंटामुक्ती समितीने कार्यवाही न केल्यास आगामी काळात उग्र आंदोलन छेडू, असा इशाराही दिला.