लातूर -बुधवारी दुपारच्या सुमारास देवणी तालुक्यातील माकणी येथे अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरुणा बाबुराव पाटील (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे.
लातूरच्या माकणीत वीज कोसळून महिलेचा मृत्यू - वीज पडुन महिलेचा मृत्यू लातूर न्यूज
लातूरच्या माकणीत बुधवारी दुपारी अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरुणाबाई बाबुराव पाटील (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे.
हेही वाचा -नागपूर: पाणीपुरी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला, संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ व्हायरल
परतीच्या पावसाने लातूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असला तरी खरीपातील सोयाबीन आणि इतर पिकांचे नुकसान होत आहे. बुधवारी अरुणा पाटील शेताकडे जनावरे घेऊन गेल्या होत्या. दुपारी 4 च्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जनावरे गोठ्याकडे घेऊन येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुली, पती असा परिवार आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.