लातूर - माझ्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास जनतेसमोर आहे. केवळ विरोधकांनी काय केले हा मुद्दा घेऊन प्रचार करीत असलेल्या भाजपाने 5 वर्षात काय दिवे लावले हे सांगावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
'आम्ही काय केले ते जनतेला माहितीये, तुम्ही काय दिवे लावले ते सांगा' हेही वाचा -आरपीआयचे कार्यकर्ते नाराज; महायुतीच्या उमेदवारांना बसणार फटका?
विरोधकच शिल्लक नाही म्हणणाऱ्या गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गल्ली बोळात सभा घेऊ लागले आहेत. महिलांना 30 टक्के आरक्षण, कारखान्यांची उभारणी, शिक्षण संस्था हे सर्व मी मुख्यमंत्री असताना झाले आहे. माझ्या कार्याची कल्पना जनतेला आहे. मात्र, 5 वर्षात आश्वसनांच्या पलीकडे आपण काय दिले, हे सांगण्याची ही वेळ आहे. शिवाजी महाराजांचे नाव पुढे करून हे मताचा जोगवा मागत आहेत. मी राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलो आहे, लोकांचा निर्णय आता झाला आहे की भामट्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -'भाजपला सत्ता येणार असल्याचा विश्वास, मग मोदी-शाहंच्या सभा का?'
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीची चौकशी लावण्याचा घाट या सरकारने घातला होता. मात्र, मी ईडीचा पाहुणचार घेणार म्हणाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त यांनी जाऊ नका अशी विनंती केली. राज्यातील तरुणाई पेटून उठल्याने मी माघार घेतली. त्यामुळे सुडाचे राजकारण सरकारकडून केले जात आहे. मात्र, हा छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, असे सांगत या सरकारला त्यांची जागा दाखविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांवर मोदी-शाहंचा वरदहस्त, पाहा काय म्हणतायेत राजकीय विश्लेषक
राज्यातील मूलभूत प्रश्न मार्गी लागलेले नाहीत, शेतीप्रश्न कायम आहेत, दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहेत असे असताना शिवसेनेचा वचननामा काय तर 10 रुपयाला थाळी हे हास्यास्पद असल्याचेही ते म्हणाले. तसेच विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना का घरी बसविले, म्हणत त्यांनी आमदार सुधाकर भालेराव यांच्यावर टीका केली.