लातूर-दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या लातूरकरांना परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या 4 दिवसांत मांजरा धरणाच्या पाणीपातळीत 4 दलघमीने वाढ झाली असून जिल्ह्यातील लहान- मोठे तलावही तुडुंब भरले आहेत. त्यामुळे लातूरकाना मोठा दिलासा मिळाला आहे.
भर पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनात चिंतेचे वातावरण होते. पुन्हा लातूरला रेल्वेने पाणी पुरवावे लागणार अशी स्थिती निर्माण होत असताना परतीच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून रिमझिम तर रविवारपासून मुसळधार पाऊस होत असल्याने पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. 24 तासांमध्ये शहराला पाणीपुरवठा मांजरा धरणात तर 3 दलघमीने पाणीसाठा वाढला आहे.