लातूर - मोदी सरकारच्या काळात झालेली कामे आणि देशाचा होत असलेला विकास यामुळे पक्षात सामील होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्यांना स्वतःची मुले सांभाळता येत नाहीत ते भाजप पक्षाची कार्यप्रणाली पाहून प्रवेश करीत आहेत. मात्र, अमित देशमुख यांनी याबाबत आशावादी राहू नये कारण ते कर्तृत्वान नाहीत, त्यांच्या वडिलांचे कर्तृत्व होते, असे म्हणत त्यांनी अमित देशमुखांवर जहरी टीका केली.
कर्तृत्वान लोकांचे पक्षात स्वागतच मात्र अमित देशमुखांनी आशावादी राहू नये : विनोद तावडे - loksabha
५६ संघटना आणि ५६ पक्ष हे मोदी विरोधात असले तरी ५६ इंच छातीसमोर त्यांचा निभाव लागणार नाही. राज्यात ऐन लढण्याच्या प्रसंगी मात्तब्बर नेत्यांनी माघार घेतली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षात इनकमिंग वाढत आहे. मोदी सरकारवरचा विश्वास वाढत असल्याने विधानसभेसाठी विरोधकांना उमेदवार मिळतो की नाही, अशी अवस्था आहे. ५६ संघटना आणि ५६ पक्ष हे मोदी विरोधात असले तरी ५६ इंच छातीसमोर त्यांचा निभाव लागणार नाही. राज्यात ऐन लढण्याच्या प्रसंगी मात्तब्बर नेत्यांनी माघार घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष यांची लढण्याची तयारी नसतानाही हायकामंडच्या आदेशामुळे लढण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. तर दुसरीकडे जे बोलायचे ते कधीच करायचे नाही अशी भूमिका घेणाऱ्या पवारांमुळे मतदारांमध्ये संभ्रमता आहे. अशीच अवस्था राहिली तर विधानसभेला तर उमेदवाराच मिळणार नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या काळातच लातूरचा विकास खुंटला. शिवाय यांच्या उदासीनतेमुळेच रेल्वेने पाणी आणण्याची नामुष्की ओढवली असल्याचे त्यांनी सांगितले.
या मतदारसंघावर देशाचे लक्ष असून मतदारांनी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महापौर सुरेश पवार, जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी तसेच नगरसेवक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.