लातूर - आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी खरीप पिक विम्यात गाव वगळल्याने अन्याय झाल्याचे कारण पुढे करत निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला होता. मात्र, दुपारी एकच्या दरम्यान पालकमंत्री संभाजी पाटील यांनी गावकऱ्यांना मोबाईवरून पीक विमा मिळवून देण्यास प्रशासन कटिबद्ध असून आपली मागणी मान्य केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर येथील मतदानकेंद्रासमोर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत शुकशुकाट असलेल्या मतदान केंद्रावर नागरिकांची लगबग पहायला मिळाली.
एक फोन आला अन् निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर लागल्या रांगा - Sambhaji Patil
आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी खरीप पिक विम्यात गाव वगळल्याने अन्याय झाल्याचे कारण पुढे करत या निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला होता.
खरीप पिक विमा जाहीर झाला. मात्र, यात आनंदवाडी या गावाला पूर्णतः वगळले आहे. त्यामुळे शेतकरी विमा रकमेपासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी चाकूर तहसीलदार यांना भेटून निवेदनही दिले व मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशाराही दिला होता. त्यानुसार दुपारी १२ पर्यंत मतदान झाले नव्हते. मात्र, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी फोनवरून गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विमा रकमेबाबत आश्वासन दिले. त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली असून अधिकाधिक मतदान करून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.