महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन व्ही. एस पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अडवला राज्यमंत्री बनसोडे यांचा ताफा - latur latest news

उदगीरमधील व्यापारी संकुलनापुढे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहनतळाची जागा खुली करण्याची मागणी व्हीएस पँथरकडून करण्यात येत आहे. त्या मासाठी पँथरच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री बनसोडे यांच्या वाहनांचा ताफा अडवला.

v s panther demand
एस पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अडवला राज्यमंत्री बनसोडे यांचा ताफा

By

Published : Oct 26, 2020, 7:13 AM IST

लातूर - उदगीरच्या व्यापारी संकुलनातील वाहनतळाची जागा खुली करण्याची मागणी दोन वर्षांपासून व्ही.एस. पँथर्स संघटनेच्या वतीने केली जात आहे. मात्र, याकडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर शनिवारी व्ही. एस.पँथर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा ताफा अडवून गाऱ्हाणे मांडले.

एस पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अडवला राज्यमंत्री बनसोडे यांचा ताफा

उदगीर शहरातील मध्यवर्ती भागात उद्योग भवन आहे. त्यामुळे वाहनधारकांची सोय व्हावी या उद्देशाने येथील व्यापारी संकुलाजवळ वाहनतळाची सोयही करण्यात आली आहे. मात्र, याठिकाणीही कॉम्प्लेक्स उभारल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी भारत राठोड यांना निवेदनही देण्यात आले होते. परंतु वर्षभराचा कालावधी लोटूनही आद्यपर्यंत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे व्ही. एस.पँथर्स च्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिली होते. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देऊन नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे.

कारवाईच्या दिल्या सूचना-

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या भागात कायम वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नगरपालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी सकाळी व्ही. एस. पँथर्सच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा ताफाचा अडवला. शिवाय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही पदाधिकारी यांचे म्हणणे ऐकून योग्य ती कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रश्न राज्यमंत्र्यांच्या अश्वसनानंतर तरी मार्गी लागणार का हे पहावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details