लातूर - मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यात पावसाने यापूर्वीच हजेरी लावली होती. मात्र, लातूर जिल्ह्यावर अवकृपा दर्शीवणारा वरुणराजा उशिरा का होईना मेहेरबान झाला. रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे, उकड्यापासूनही नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
उशिरा का होईना लातुरात पावसाचा श्रीगणेशा; जिल्ह्यात सर्वत्र सक्रिय
यंदाही खरिपाचे काय होणार याबाबत साशंका होती. मात्र, सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात हा पाऊस झाला आहे.
संबंध उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करूनही वेळीच पाऊस न आल्याने शेतकऱ्यांसह सर्वांवरच चिंतेचे ढग निर्माण झाले होते. २४ जून उजाडला तरी जिल्ह्यात एकही पाऊस झाला नव्हता त्यामुळे यंदाही खरिपाचे काय होणार याबाबत साशंका होती. मात्र, सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात हा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी जून अखेरपर्यंत पावसाची २५० मिमी इतकी नोंद झाली होती. मात्र यावर्षी पावसाची १०० मिमी इतकी ही नोंद झालेली नाही. एकूणच लातूर जिल्ह्यात बरसलेल्या या पावसाने येत्या काळातही चांगलाच जोर धरावा जेणेकरून रखडलेल्या पेरण्या आणि तीव्र पाणी टंचाईपासून लातूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळू शकेल.