लातूर -युती कशी झाली? याबाबत शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मोदींसमोरच स्पष्टीकरण दिले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेने हाताळलेल्या मुद्द्यांचा समावेश आहे. यामध्ये राम मंदिर असो, की काश्मीरमधील ३७० कलम रद्द होण्याबाबतचा निर्णय असो, या मुद्दयांचा समावेश असल्यानेच ही युती झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लातूर येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
'हे' आहे युती होण्याचे मुख्य कारण; उद्धव ठाकरेंचे मोदींसमोर स्पष्टीकरण - शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
दोन्ही पक्षात मतभेद होते. मात्र, मनभेद नाही. यातच जाहीरनाम्यात सर्व मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजाच्या हिताचे निर्णय आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी मोदी हेच पंतप्रधान होणे गरजेचे असल्याचेही शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे यासाठी शिवसेनेने नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने जाहीरनामा सादर केला आहे. मराठवाड्यातील पाणी पळवून नेण्याचे काम आघाडी सरकारने केल्याने ही दुष्काळजन्य स्थिती ओढवली असल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केला. जलसंधारणाच्या अनुषंगाने राज्यसरकार काम करीत आहे. मात्र, या दुष्काळापासून वंचित ठेवण्यासाठी केंद्रसरकारने भूमिका घेणे महत्वाचे आहे. सध्या जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याचा प्रश्न संबंध मराठवाड्यात जाणवत आहे. शिवाय पिकविम्यापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे यंत्रणा सक्षमपणे राबवून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
दोन्ही पक्षात मतभेद होते. मात्र, मनभेद नाही. यातच जाहीरनाम्यात सर्व मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजाच्या हिताचे निर्णय आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी मोदी हेच पंतप्रधान होणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.