महाराष्ट्र

maharashtra

विद्युत तारेचा शाॅक लागून सख्ख्या भावांचा मृत्यू; जळकोट तालुक्यातील घटना

By

Published : Jun 11, 2020, 6:22 PM IST

वादळी वाऱ्याने शेतामध्ये वीजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. पाईप गोळा करण्यासाठी या भावांनी तारा बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना वीजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

two-dead-due-to-electric-shock-at-jalkot-latur
विद्युत तारेचा शाॅक लागून सख्ख्या भावांचा मृत्यू

लातूर- वादळी वाऱ्याने तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. जळकोट तालुक्यातील हळदवाढवना येथे ही घडली आहे. शेतातील तुषासिंचनांचे पाईप गोळा करीत असताना ही दुर्घटना घडली आहे.

विद्युत तारेचा शाॅक लागून सख्ख्या भावांचा मृत्यू

परमेश्वर दहिफळे (वय 24) आणि कपिल दहिफळे (वय 22) हे दोघे गुरुवारी सकाळी 8 वाजता शेतामध्ये गेले होते. गेल्या दोन दिवसात तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसत आहे. त्यामुळे तुषासिंचनाचे पाईप गोळा करुन ठेवण्याचे काम शेतात सुरू होते. मात्र, वादळी वाऱ्याने शेतामध्ये वीजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. पाईप गोळा करण्यासाठी या भावांनी तारा बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना वीजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. यानंतर महसूल, महावितरण आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. दोन्ही भावांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details