लातूर - जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 13 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एका दिवसात आढळून येणारा हा सर्वांत जास्तीचा आकडा आहे. त्यामुळे लातूरकरांच्या चिंतेत भर पडत आहे.
उदगीरमध्ये 12 तर लातुरात एक नवा रुग्ण; एकूण कोरोना रुग्णांची संख्या 119 वर - उदगीरमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण
जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 119 झाली आहे. 58 जणांवर उपचार सुरू आहेत. 58 नागरिक बरे होऊन घरीही परतले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-पुण्याहून वाहतूक सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी यात 13 रुग्णांची यामध्ये भर पडली. एकीकडे नियमात शिथिलता आणली जात आहे. तर, दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे.
जिल्ह्यातील उदगीर, लातूर या शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी येथील विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात 106 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी आले होते. पैकी मूळचा लातूर तालुक्यातील भातांगळी येथील असून तो वास्तव्यास लातूर शहरातील नांदेड रोडवर आहे. 13 मे रोजी हा रुग्ण पुणे येथून आला होता. तर, दुसरीकडे उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून 16 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी 12 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून चौघांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आता जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 119 झाली असून 58 जणांवर उपचार सुरू आहेत. 58 नागरिक बरे होऊन घरीही परतले आहेत. तर, तिघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मुंबई-पुण्याहून वाहतूक सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी तर 13 रुग्णांची यामध्ये भर पडली. एकीकडे नियमात शिथिलता आणली जात आहे. तर, दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनावरील ताणही वाढला आहे. उदगीर शहरात सुरवातीपासूनच रुग्ण वाढत असून गेल्या महिन्याभरापासून हीच स्थिती कायम आहे.