महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रक-मोटरसायकलच्या अपघातात तरुणाचा मृत्यू; लातूर-नांदेड महामार्गावरील घटना - truck bike accident on latur nanded highway

चाकूरहून हकाणी करीमसाब कुबडे हा तरुण अहमदपूरकडे निघाला होता. मध्यप्रदेशातील ट्रक एम.एच. 40 बी. जी. 7995 हा माल घेऊन लातूरकडे निघाला होता. यावेळी चपोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ अहमदपूरहून लातूरकडे मार्गस्थ होणाऱ्या ट्रकचा समोरासमोर अपघात झाला होता.

truck bike accident on latur-nanded highway 1 died
ट्रक-मोटरसायकलच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

By

Published : Jun 25, 2020, 12:30 AM IST

लातूर - ट्रक-दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना लातूर-नांदेड महामार्गावर चाकूर जवळील चापोली येथे मंगळवारी घडली. हकाणी करीमसाब कुबडे (वय - 18 ) असे मृताचे नाव आहे. अपघाताची नोंद चाकूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मृत हकाणी करीमसाब कुबडे

चाकूरहून हकाणी करीमसाब कुबडे हा तरुण अहमदपूरकडे निघाला होता. मध्यप्रदेशातील ट्रक (क्र. एम.एच. 40 बी. जी. 7995) हा माल घेऊन लातूरकडे निघाला होता. यावेळी चपोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ अहमदपूरहून लातूरकडे मार्गस्थ होणाऱ्या ट्रकचा समोरासमोर अपघात झाला होता. जखमी अवस्थेत असलेल्या हकाणी यास उपचारासाठी चपोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले होते. मात्र, तो गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी चाकूर येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -पेट्रोलच्या किमतींमुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री; जाणून घ्या राज्यभरातील दर

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, जमादार मारोती तुडमे, माधव सारोळे घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर चाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. तर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details