लातूर : सरकारने 'वन नेशन, वन टॅक्स' असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा टॅक्स हा भरवाच लागत आहे. त्यामुळे लहान-मोठे व्यापारी, उद्योजक अडचणीत आले आहेत. यावर तत्काळ तोडगा काढावा या मागणीसाठी लातुरात व्यापाऱ्यांनी आंदोलन केले.
कायद्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी
जीएसटी कायद्यात अनेक त्रुटी असून याचा फटका व्यापाऱ्यांना बसत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी या त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. हे काम करताना सीए आणि कर सल्लागार यांची प्रचंड धावपळ होत आहे. कायद्यातील आठ त्रुटी आहेत त्यात काही प्रमाणात का होईना सुधारणा करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.