लातूर - काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये आज लोकसभा प्रचाराचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण होणार आहे. यानिमित्त काँग्रेसचे सर्वच बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आजही लातूरकरांच्या मनात आदर कायम आहे. आज त्यांच्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. मांजरा कारखान्यावर हा कार्यक्रम होणार आहे.