लातूर - शनिवारी उदगीर येथील 70 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान अवघ्या काही वेळात महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कात आलेल्या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेल्या लातूरकरांची चिंता आता वाढू लागली आहे.
लातूरकरांची चिंता वाढली : 'त्या' महिलेच्या संपर्कातील तिघांना कोरोनाची लागण - लातूर लॉकडाऊन
शनिवारी उदगीर शहरात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता आणि त्याचा मृत्यूही झाला आहे. सदरील महिलेला कोरोनाची लागण झाली कशी याचा तपास सुरू आहे. मात्र, संपर्कात आलेल्या 26 जणांचे नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात आणण्यात आले होते.
शनिवारी उदगीर शहरात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता आणि त्याचा मृत्यूही झाला आहे. सदरील महिलेला कोरोनाची लागण झाली कशी याचा तपास सुरू आहे. मात्र, संपर्कात आलेल्या 26 जणांचे नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात आणण्यात आले होते. पैकी 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत तिघांचे पॉझिटिव्ह तर 2 जणांच्या रिपोर्टचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे या दोघांचे 48 तासांनंतर स्वॅब घेऊन पुन्हा तपासणी केली जाणार आहे. तर इतर तिघांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
दरम्यान, उदगीर येथील अजून 30 जणांचे नमुने घेण्यात आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या लातुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे सर्व रुग्ण उदगीर येथील असल्याने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.