महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्पर्धा परीक्षा लांबणीवर; लातुरातही विद्यार्थ्यांचे आंदोलन

स्पर्धा परीक्षेसाठी तारीख-पे-तारीख अशीच काहीशी भूमिका राज्य सरकार घेत आहे. गेल्या वर्षभरात 11 वेळा या परीक्षेची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून बुधवारी पुन्हा या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Students agitation in Latur
स्पर्धा परीक्षा लांबणीवर न्यूज

By

Published : Mar 11, 2021, 7:48 PM IST

लातूर - वर्षानुवर्षे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. यंदा मात्र, कोरोनामुळे परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. 14 मार्च रोजी होणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

स्पर्धा परीक्षा लांबणीवर; लातुरातही विद्यार्थ्यांचे आंदोलन

परीक्षेलाच विरोध का?

राज्यात निवडणुका पार पाडतात, सार्वजनिक कार्यक्रम होतात. एवढेच नाही तर, राजकीय कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडतात. मग परीक्षेलाच कोरोनाचा अडसर का, असा सवाल विद्यार्थ्यांनी करीत आंदोलन केले. परीक्षेबाबतच्या या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. शहरात विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र जमा झाले. सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी केला रस्ता जाम

यापूर्वी 11 वेळेस परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सध्या लातुरात शेतकऱ्यांची मुले-मुलीही या परीक्षेचा अभ्यास करत आहेत. त्यांना महिन्याला किमान 6 हजाराचा खर्च येतो. हा खर्च कोठून भागवायचा, असा प्रश्न यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. यासाठी नियोजित वेळेस परीक्षा घ्यावी, ही मागणी करत विद्यार्थ्यांनी रस्ता जाम केला. कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details