महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना व्हायरस: लातूरचा आशिष गुरमे अडकला चीनमध्ये - latur news

चीनमध्ये करोना व्हायरसचा धोका वाढल्यानंतर त्यांच्या पालकांसह सर्वांनाच त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील लातूरमधील एकाचा समावेश आहे.

आशिष गुरमे
आशिष गुरमे

By

Published : Feb 1, 2020, 8:03 AM IST

लातूर-चीनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या ७ विद्यार्थ्यांपैकी एक लातूरमधील आहे. आशिष गुरमे असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भीतीची वातावरण असल्याने तो सुखरूप परत यावा, अशी प्रार्थना लातूरकरांनी केली आहे.

लातूरचा आशिष गुरमे अडकला चीनमध्ये

हेही वाचा-कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ५ दिवस, विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

लातूर शहरातील आशिष गुरमे हा गेल्या दोन वर्षांपासून चीनमधील सियाचीन येथील एका विद्यापीठात शिक्षण घेत आहे. मात्र, सध्या कोरोना या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग वाढला असल्याने आशिषला विद्यापीठाच्या प्रशासनाने हॉस्टेलमधून बाहेर पडण्यास सक्त मनाई केली आहे. आशिष आता सध्या आई वडिलांच्या संपर्कात असला तरी त्याला भारतात परत यायचे आहे. याकरिता भारत सरकार प्रयत्न करीत असल्याचेही त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. लागलीच मदत मिळावी, अशी अपेक्षा आशिषच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details