लातूर - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अभ्यासक्रम बदलल्याने या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचा निकालाचा टक्का घसरला आहे. परीक्षेच्या तोंडावर अभ्यासक्रम बदलण्यात आला असून एकाच दिवशी दोन पेपर देखील घेण्यात आहे. यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्रात आंदोलन केले.
पूर्वीप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी आणि झालेल्या परीक्षेचे पुनर्मूल्यांकन करावे, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे गुणवत्ता ढासळली आहे. शिवाय केवळ १० टक्केच विद्यार्थी हे सत्र परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. याचे खापर विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर फोडले.