महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारला धक्का लागल्याने बस चालकास बेदम मारहाण - करडखेलपाटी गाव

करडखेलपाटी येथे एक बस कारला धडकली. यानंतर बस चालक मोरे यांना कारमधील राजकुमार बिरादार आणि हावगीराव बिरादार यांनी बेदम मारहाण केली.

एसटी चालकास मारहाण करताना

By

Published : Apr 24, 2019, 4:59 PM IST

लातूर - उदगीर तालुक्यातल्या करडखेलपाटी येथे भरधाव कारला एसटीचा धक्का लागल्याने एसटी चालकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

एसटी चालकास मारहाण करताना

एसटी बस चालक हरिबा मोरे हे मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लातूरहुन (एम. एच.२० बी एल १९१४) उदगीरला बस घेऊन जात होते. त्यावेळी करडखेलपाटी येथे समोरून भरधाव वेगात एक कार (एम.एच.२४ व्ही. ३१३१) आली. साइड देताना ही बस कारला धडकली. यानंतर बस चालक मोरे यांना कारमधील राजकुमार बिरादार आणि हावगीराव बिरादार (रा. गंगापूर ता. उदगीर) यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. आरोपींवर उदगीरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात एसटी बस आणि कारचे किरकोळ नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details