लातूर - एचआयव्ही संक्रमित अनाथ मुलांसाठी हासेगाव येथे प्रा. रवी बापटले यांनी एक सेवालयाला सुरू केले. मात्र, सेवालयाचे प्रमुख बापटले यांना गावगुंड भीमाशंकर बावगे त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांनी या गाव गुंडाला हद्दपार करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत समोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
अनाथांची सेवा करणाऱ्या बापटलेंना गावगुंडाचा त्रास ; हद्दपारिसाठी आमरण उपोषण
एचआयव्ही संक्रमित अनाथ मुलांसाठी हासेगाव येथे रवी बापटले एक सेवालय चालवत आहेत. मात्र, त्यांना भीमाशंकर बावगे हा व्यक्ती त्रास देत आहे. त्यामुळे त्यांनी या गाव गुंडाला गावातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
बापटले यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी गाव गुंड बावगे यांना हद्दपार केल्याशिवाय उपोषण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. २००७ साली अनेक अडचणींचा सामना करत केवळ १ एचआयव्ही संक्रमित अनाथ मुलाला घेऊन सेवालायला सुरूवात केली. याकरता शांतेश्वर मुक्ता यांनी त्यांना जमीन दान केली. मात्र, या प्रकल्पास सुरूवातीपासूनच गावचे माजी सरपंच बावगे यांनी विरोध केला. सेवालयाच्या विरोधात अनेक कुरापती केल्या त्यामुळे बावगेविरोधात ४ प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, तरीही त्यांनी या सेवालयाला विरोध चालूच ठेवला. आता तर त्यांनी ग्रामपंचायतीच्या सभेत सेवालायचे बांधकाम जेसीबीने पाडण्याचा ठराव घेतला आहे. शिवाय अधिकृत विद्युत जोडणीसाठीही विरोध केला आहे. त्यामुळे सेवालायला १२ वर्ष पूर्ण झाली असली तरी मूलभूत बाबींसाठी प्रा. बापटले यांना ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तर सेवालयाच्या जागेचा ८ अ ची नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. या सेवायलयाबाबत संपूर्ण गाव सकारात्मक असताना बावगे यांचा विरोध का? असा, सवाल उपस्थित होत आहे.
यापूर्वीही बापटले यांनी जिल्हा प्रशासनाकडे बावगेंना गावातून हद्दपार करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासमवेत शांतेश्वर मुक्ता यांचीही उपस्थिती आहे. ३ पैकी सेवालयाच्या ८ अ ची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्याची मागणी मान्य झाली आहे. सोमवारी रात्री औसा पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी यांनी बापटले यांची भेट घेऊन कारवाईचे आश्वासन दिले आहे. उर्वरित मागण्याही मान्य कराव्यात अन्यथा उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.