महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औसातून मुख्यमंत्र्यांचे पीए तर निलंग्यामध्ये पुन्हा काका-पुतण्यात लढाई - औसा विधानसभा मतदारसंघ उमेदवार

पूर्वीपासून शिवसेनेकडे असलेल्या औसा विधानसभा मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तर लातूर शहर मतदारसंघासाठीही भाजपचाच उमेदवार निश्चित मानला जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे परंपरागत मतदारसंघ भाजपने आपल्याकडे वळवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

औशातून मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार तर निलंग्यात पुन्हा काक-पुतण्यात लढाई

By

Published : Oct 2, 2019, 2:12 PM IST

लातूर-जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढत असून त्याचा परिणाम जागा वाटपावरही झाल्याचे दिसत आहे. पूर्वीपासून शिवसेनेकडे असलेल्या औसा विधानसभा मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तर लातूर शहर मतदारसंघासाठीही भाजपचाच उमेदवार निश्चित मानला जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे परंपरागत मतदारसंघ भाजपने आपल्याकडे वळवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर लातूर ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सोडण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -स्टार्कच्या बायकोचा विश्वविक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ठोकल्या नाबाद १४८ धावा!

भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांची निलग्यातून वर्णी लागली आहे. त्यामुळे याहीवेळी येथून काका अशोकराव पाटील निलंगेकरांच्या विरोधात संभाजी यांना दंड थोपटावे लागणार आहेत. तसेच, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या औसा मतदारसंघात भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. औसा मतदारसंघ हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे मात्र, यावेळी येथून भाजपच्या अभिमन्यू पवार यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेकडून इच्छूक असलेले संतोष सोमवंशी यांचा पत्ता कट झाला आहे. आता ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचप्रमाणे अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार विनायकराव पाटील यांनाच परत उमेदवारी देण्यात आली आहे. २०१४ च्या निवडणूकीत ते अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला. विनायकराव पाटलांना उमेदवारी दिल्याने अहमदपूरमधून अनेक इच्छूक नाराज असल्याचे बोलले जात आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्यातरी निलंगा, औसा, अहमदपूर या विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, आता उत्सुकता आहे. ती लातूर शहर, लातूर ग्रमीण अन् उदगीर मतदारसंघाची.

ABOUT THE AUTHOR

...view details