लातूर- नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध दर्शवत आज उदगीरमध्येही आक्रोश मोर्चा काढण्यात आला. चौभार ते उपजिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा-CAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसी
नागरिकत्व संशोधन कायदा म्हणजे धर्मभेदाला पाठबळ दिले जात आहे. केंद्र सरकारडकडून विविधतेत ऐकतचे स्वरूप असलेल्या देशात फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप करत या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी या नागरिकत्व कायद्याला विरोध केला जात आहे.
आज निलंगा आणि उदगीरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा आक्रोश मोर्चा असला तरी उदगीरकारांनी शांततेचे दर्शन घडवून दिले. चौभार ते उपजिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. नागरिकत्व संशोधन कायदा कसा धोकादायक आहे. हे यावेळी पाठवून देण्यात आले. शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले.