लातूर-कोरोना विषाणूमुळे संसर्गित झालेले रुग्ण मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आढळून आले आहेत. लातूरमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरवातीला आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात होऊ नये म्हणून सतर्कता घेतली जातेय. अहमदपूरच्या पोलीस उपअधीक्षक डॉ.अश्विनी पाटील यांच्या संकल्पनेतून अहमदपूर तालुक्यातील प्रमुख गावांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
संभाव्य कोरोनाबाधित गावात प्रवेश करुन नये म्हणून गावांनी गावबंदी केली आहे. संचारबंदीच्या नियमांचे ग्रामीण भागात पालन होते का याची पाहणी करण्यासाठी अहमदपूर पोलीस उपअधीक्षक डॉ.अश्विनी पाटील यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील हाडोळतीसह परिसरातील गावांची पाहणी ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आली आहे.