लातूर - गुरुवारी मध्यरात्री लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या पंढरपूर-हदगाव बसमध्ये बसून गोळीबार करणारा इसम हा सेवानिवृत्त माजी सैनिक असल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात बंदुकीमधील गोळी खिडकीच्या गजाला आदळून परत त्यालाच लागली. त्यानंतर तो माजी सैनिक घटना स्थळावरून पसार झाला होता.
एसटी बसमध्ये गोळीबार करणारा 'तो' होता माजी सैनिक - hospital
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. तो जखमी असल्याने तो कोणत्यातरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईल यांचा अंदाज पोलिसांनी घेतला आणि शहरातील दवाखान्यात शोध मोहीम सुरू केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. तो जखमी असल्याने तो कोणत्यातरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईल यांचा अंदाज पोलिसांनी घेतला आणि शहरातील दवाखान्यात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, हा व्यक्ती लातूरच्य शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचे तपासात समजले. पोलिसांनी तातडीने शासकीय रुग्णालय गाठले असता, तो अहमदपूर तालुक्यातील माजी सैनिक बालाजी शंकरराव मुखेडे असल्याचे समोर आले आहे.
बसमध्ये चुकून गोळीबार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये त्यांच्या हाताच्या करंगुळीला जखम झाली असून उपचारानंतर रुग्णालयातून त्याला सोडण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यातील होकर्णा गावचा रहिवाशी आहे. सध्या तो अहमदपूर शहरात राहतोय. कशामुळे या इसमाने गोळीबार केला याबद्दल पोलीस तपास करत आहेत.