महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्याने' मृत्यूवरही मिळवला 'विजय'; लातूरच्या पायलटचे गावकऱ्याने केले जंगी स्वागत - एअरशो

बंगरुळ येथे एअर शो दरम्यान दोन विमानांमध्ये अपघात झाल्याने ही दुर्घटना घडली होती. याच विमानांच्या टीममध्ये विजय शेळके यांचा समावेश होता. जमिनीपासून साधारणतः १०० मीटर ऊंचीवर हा अपघात झाला होता. अपघात होताच विजय शेळके इजेक्शन सीटच्या सहाय्याने विमानाबाहेर आले

विजय शेळके यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले

By

Published : Apr 3, 2019, 9:03 AM IST

लातूर - एअरशोच्या सरावा दरम्यान १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या एअरक्रॅशमधून पायलट विजय शेळके हे थोडक्यात बचावले होते. तब्बल दीड महिन्याच्या उपचारानंतर सोमवारी ते शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगावया त्यांच्या गावी आले. गावात येताच गावकऱ्यांकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. सबंध गावाने त्यांचे स्वागत केले. शिवाय दिवसभर विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.

विजय शेळके गावी परतल्यानंतर लोकांनी गावजेवण दिले


बंगरुळ येथे एअर शो दरम्यान दोन विमानांमध्ये अपघात झाल्याने ही दुर्घटना घडली होती. याच विमानांच्या टीममध्ये विजय शेळके यांचा समावेश होता. जमिनीपासून साधारणतः १०० मीटर ऊंचीवर हा अपघात झाला होता. अपघात होताच विजय शेळके इजेक्शन सीटच्या सहाय्याने विमानाबाहेर आले. पॅरेशूटच्या सहाय्याने ते जमिनीवर सुरक्षित उतरले. त्यांच्याबरोबर चंदीगड येथील सहाकारीही सुखरूप बाहेर निघाले होते. पण, दुसऱ्या विमानातील विंग कमांडर साहिल गांधी यांचा मृत्यू झाला होता.


वायुसेनेच्या हॉस्पीटलमध्ये दीड महिना उपचार घेतल्यानंतर विजय शेळके आपल्या मुळ गावी परतले आहेत. आज सकाळी गावातून विजय शेळके यांची मिरवणूक काढण्यात आली. गावचा पायलट सुखरूप परल्याने गावात आज दिवसभर जेवणाच्या पंगती उठल्या. सबंध गावात विजयोत्सव साजरा करण्यात आला. मेडीकल रजेवर विजय हे गावी परतले असून, त्यांच्या आगमनाने गावात एक उत्सवच साजरा केला जात आहे. विजय शेळके या पायलटने आतापर्यंत ७० एअरशोज केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details