महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाची धास्ती त्यात पाणीटंचाईने घशाला कोरड: आलमला गावातील नागरिक हवालदिल

आलमला गावात दरवर्षी मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाई असते. एकीकडे भीषण पाणीटंचाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट यात आलमला गावचे नागरिक हवालदिल झाले आहेत.

By

Published : Mar 30, 2020, 1:30 PM IST

Water
प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर - शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची दहशत पसरली झाली आहे. कोरोनाचे संकट एकीकडे गडद होत असताना गावखेडी पाण्याच्या भीषण समस्येला सामोरे जात आहेत. औसा तालुक्यातील आलमला गावतील नागरिकांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावालगत असलेल्या विहिरीवर पाणी भरताना योग्य अंतर तर नाहीच शिवाय मास्कचा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाची धास्ती त्यात पाणीटंचाईने घशाला कोरड: आलमला गावातील नागरिक हवालदिल


आलमला हे गाव ७ हजार लोकसंख्येचे आहे. या गावात दरवर्षी मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाई पाचवीला पूजलेलीच असते. यंदाही गावाला पाणी पुरवठा होत असलेली पाईपलाईन नादुरुत झाल्याने गावाला पाणी टंचाईच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका असतानाही भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने येथील नागरिकांना घराबाहेर पडावेच लागते. गावातीलच विहिरीवर बोअरचे पाणी सोडले जाते.

घागरभर पाण्यासाठी या विहिरीवर महिलांची मोठी गर्दी होते. अनेकजण शेतातून पाणी आणत आहेत. एकीकडे भीषण पाणीटंचाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट यात आलमला गावचे नागरिक हवालदिल झाले आहेत. विहिरीत बोअरवेलचे पाणी पाईपने टाकत असताना सोशल डिस्टन्सींग तसेच मास्कचा वापर पाणी भरणाऱ्या महिला व अन्य व्यक्ती करताना दिसत नाहीत. यामुळे कोरोनाचा धोका निर्माण होवू शकतो. याबाबत ग्रामस्तरावर योग्य उपाययोजना होताना दिसत नाही. ग्रामसेवक व तलाठी गावात हजर राहण्याचे आदेश असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरापुरते सतर्क असलेले प्रशासन ग्रामीण भागाकडे लक्ष देणार का ? हा सवाल कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details