महाराष्ट्र

maharashtra

दिलासादायक..! लातुरात कोरोना रुग्णसंख्येत घट, काल दिवसभरात आढळले केवळ 15 रुग्ण

By

Published : Nov 15, 2020, 1:42 AM IST

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लातूर जिल्ह्यात दिवसाकाठी 400 ते 500 रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. पण, गेल्या महिन्यापासून रुग्णांची संख्या घटत आहे. आठवड्याभरापूर्वी 29 रुग्ण आढळून आले होते. ही सर्वात कमी संख्या होती, तर काल केवळ 15 रुग्ण आढळून आले. त्यामुळे, लातूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

लातूर-गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. दिवाळी सणात धोका वाढेल, असा अंदाज वर्तवला जात होता, पण रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. काल जिल्ह्यात दिवसभरात केवळ 15 रुग्ण आढळून आले आहेत.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लातूर जिल्ह्यात दिवसाकाठी 400 ते 500 रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. पण, गेल्या महिन्यापासून रुग्णांची संख्या घटत आहे. आठवड्याभरापूर्वी 29 रुग्ण आढळून आले होते. ही सर्वात कमी संख्या होती, तर काल केवळ 15 रुग्ण आढळून आले. त्यामुळे, लातूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

आतापर्यंत एकूण 20 हजार 921 रुग्ण आढळलेत

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 20 हजार 921 रुग्ण आढळले असून त्यापैकी 19 हजार 925 रुग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात 631 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रुग्णसंख्या कमी झाली तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. पण, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहरासह ग्रामीण भागात नागरिक आता मास्क, तसेच सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करीत आहेत. रुग्णसंख्या कमी असली तरी धोका आद्यपही टळलेला नाही. त्यामुळे, नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

रुग्णसंख्येबरोबर टेस्टचे प्रमाणही घटले

लातूर शहरातील 7 केंद्रावर कोरोना टेस्ट केली जात होती. त्यापैकी आता केवळ 2 केंद्रावर ही तापसणी केली जात आहे. शिवाय, एका केंद्रावर दिवसाला 300 ते 400 नागरिक येत होते, ते प्रमाण आता 100 वर आहे. त्यामुळेच, रुग्णसंख्या घटली असल्याचे चित्र आहे. पण, लक्षणे असल्यास नागरिकांनी तपासणी करणे आवश्यक आहे.

हेही वाचा-प्रेम प्रकरणातून युवकाची आत्महत्या; घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details