निलंगा(लातूर)-दारूचे आमिष दाखवत मुक्तार पांढरे याला गावाजवळील स्मशानभूमी मध्ये नेत रबरी पाईपने मारहाण गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील केळगाव येथे घडली आहे. मुक्तार पांढरे यांनी या प्रकरणी ईलाही हैदरसाब डाळींबकर विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
निलंगा पोलिसांनी या प्रकरणाबाबत दिलेली माहिती अशी की निलंगा तालुक्यातील केळगाव येथील ईलाही हैदरसाब डाळींबकर याने मित्र मुक्तार बशीर पांढरे यास गावाजवळ असलेल्या स्मशानभूमी मध्ये दारुचे आमिष दाखवत नेले. पांढरे याला स्मशानभूमीत नेऊन रबरी पाईपने डाळींबकर याने मारहाण केली. डोक्यात दगड घालत डोके फोडले, हाता पायावर मारहाण करत जखमी केले, अशी तक्रार पांढरे याने पोलिसांत दिली आहे.