लातूर - बसमधून खाली उतरलेल्या एका प्रवाशाचा बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना किनगाव बस स्थानकावर शुक्रवारी दुपारी घडली आहे. वामन नागोबाराव गायकवाड (वय 70), असे मृत प्रवाशाचे नाव आहे. प्रवासी बसचालकाच्या निदर्शनास न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बसखाली चिरडून वृद्ध प्रवाशाचा मृत्यू; लातूरच्या किनगावातली घटना
मृत वामन गायकवाड हे एमएच 20 बीटी 1419 क्रमांकाच्या अहमदपूर-अंबाजोगाई या बसने आपल्या चिखली गावाकडे निघाले होते. दरम्यान, ते किनगाव बसस्थानकावर उतरले. चालक चंद्रकांत कांगणे हे बस मागे घेत असताना गायकवाड मागच्या चाकाखाली आले. या दुर्घटनेत गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्रातिनिधीक छायाचित्र
हेही वाचा -वर्ध्यात बस अन् दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, २ जखमी केशरी दिव्याच्या गाडीतून पोहोचले रुग्णालयात
मृत गायकवाड हे एमएच 20 बीटी 1419 क्रमांकाच्या अहमदपूर-अंबाजोगाई या बसने आपल्या चिखली गावाकडे निघाले होते. दरम्यान, ते किनगाव बसस्थानकावर उतरले. चालक चंद्रकांत कांगणे हे बस मागे घेत असताना गायकवाड मागच्या चाकाखाली आले. या दुर्घटनेत गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद किनागाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.